Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

खुंटामोडीच्या ओसाड माळरानावर फुलणार वनराई विद्यार्थी अन् लोकसहभागातून २० हजार वृक्ष लागवड



खुंटामोडीच्या ओसाड माळरानावर फुलणार वनराई

विद्यार्थी अन् लोकसहभागातून २० हजार वृक्ष लागवड 


                               धडगाव : विविध मार्गांनी झालेल्या आघातामुळे खुंटामोडी (ता.धडगाव) येथील बहुतांश जमीन ओसाड अन् उजाड बनली. ही जमीन नव्याने फुलवण्यासाठी विद्यार्थी अन् ग्रामस्थांच्या सहभागातून २० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी नव्याने वनराई निर्माण होईल.

        पर्यावरणाच्या दृष्टीने गावाला गतवैभव मिळवून देण्यासाठी खुंटामोडी येथील उपसरपंच गेमलसिंग वळवी यांच्या संकल्पनेतून २०११ पासून दरवर्षी वृक्ष लागवड केली जात आहे. त्यानुसार यंदा माध्यमिक विद्यालय, जि.प.शाळेचे विद्यार्थ्यांसह संपूर्ण ग्रामस्थांच्या सहभागातून २० वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच दत्तू वळवी, उपसरपंच गेमलसिंग वळवी, कात्रीचे सरपंच संदीप वळवी, डॉ.राजेंद्र दहातोंडे, डॉ. वैभव गुरवे, माध्यमिक मुख्याध्यापक सुकलाल वळवी, दिलीप वळवी, किसन वळवी, मुकेश वळवी, ग्रा.प.सदस्य खेतमल वळवी, विजया वळवी, मोगराबाई वळवी,  वनविभागाचे दीपक जमदाडे, रेखा पावरा, दिनकर वळवी, पोपटा वळवी, रविता पाडवी यांच्यासह अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होते. 


 चराई बंदीचे आवाहन :-

कार्यक्रमात उपस्थित वनविभागाचे जमदाडे यांनी झाडांच्या वाढीबाबत मार्गदर्शन करताना वृक्ष लागवड झालेल्या क्षेत्रात गुरे, चारण्यास प्रतिबंध करण्याचे आवाहन केले. तर डॉ.वैभव गुरवे यांनी झाडांच्या वाढीसाठी पाणी व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. याशिवाय जिल्हा नियोजन अधिकारी काळे यांनीही मार्गदर्शन केले.


 पारंपरिक झाडांची लागवड:-

आदिवासींचे अर्थकारण महू, आंबा व चारोळी या झाडांवर अवलंबून आहे. त्या दृष्टीने खुंटामोडीत या झाडांचीच सर्वाधिक लागवड करण्यात आली. याशिवाय सागवान व खैर झाडांचे देखील लागवड केली.









Post a Comment

0 Comments