भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नंदुरबार: पाणी तपासणी मोहिमेत राज्यात अव्वल
नंदुरबार जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) ही पाणी गुणवत्तेच्या परीक्षणासाठी कार्यरत एक महत्त्वाची शासकीय संस्था असून, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियमित जलनमुना तपासणीसाठी काम करत आहे.
जलनमुना तपासणीची प्रभावी यंत्रणा:
जिल्ह्यातील भूजल यंत्रणेअंतर्गत एक जिल्हा प्रयोगशाळा (NABL Accrediated) आणि अक्कलकुवा, धडगाव, नवापूर व तळोदा येथे तालुका स्तरावरील चार NABL Recognised उपप्रयोगशाळा कार्यरत आहेत. शहादा तालुक्यातील जलनमुने जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात.
मान्सूनपूर्व तपासणी मोहिमेमध्ये जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक:
सन 2025-26 च्या मान्सूनपूर्व रासायनिक व अणुजैविक तपासणी मोहिमेंतर्गत एकूण 18,396 पाणी नमुने तपासले गेले असून, या कामगिरीबद्दल नंदुरबार जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुषित नमुन्यांची माहिती संबंधित ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवण्यात आली असून, त्यांची पुन्हा तपासणी करून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
मानव संसाधन स्थिती:
एकूण २२ मंजूर पदांपैकी १३ पदे कार्यरत असून ९ पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळांमध्ये रसायनी, अणुजैविक तज्ञ, सहाय्यक व मदतनिस पदांवर काम सुरू आहे. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षातही आवश्यक कर्मचारी कार्यरत आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर भर:
ही जलनमुना तपासणी केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण गावाच्या पर्यावरणीय सुरक्षिततेसाठीही महत्त्वाची आहे. राज्य शासनाच्या "स्वच्छ व सुरक्षित पाणी" धोरणाची अंमलबजावणी यामुळे सुलभ होत आहे.
.
.
.
#GSDA #watertesting #nandurbarfirstinstate #CleanWaterMission #panitapasaniyanthra #SafeDrinkingWater #MonsoonPreparedness #NABLLAB #GroundwaterAwareness #jalsuraksha

Post a Comment
0 Comments