जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक ; माकप तळोदा तालुका कमिटीची बैठक संपन्न.
दोन गटात तर पांच गणात निवडणूक लढविणार; काहींची उमेदवारी जाहीर
तळोदा :- नंदुरबार जिल्हा परिषद व तळोदा तालुका पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठक उमरी येथे पार पडली. बैठकीत निवडणूक रूपरेषा आखण्यात आली तालुक्यातील दोन गट व पाच गणात निवडणूक लढवीत पक्षाचे उमेदवार देण्याची निश्चित के आहे. काही इच्छुकांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा तालुका कमिटीची बैठक उमरी येथे आयोजन करण्यात आली. यावेळी १६ सदस्यांपैकी १३ सदस्य उपस्थित होते. निवडणूक लढण्याची बैठकीत कमिटीने एकमताने निर्णय घेतला आहे. तळोदा तालुक्यातील बोरद व आमलाड जि. प गट व तऱ्हावद/छोटा धनपुर, आमलाड, धनपुर, मोड व बोरद गण या पाच गणात पक्षाचे उमेदवार देण्याचे निर्णय घेण्यात आला.
आमलाड जिल्हा परिषद गटात काँ. रुबाबासिंग ठाकरे व काँ. सुदाम ठाकरे (डमी उमेदवार) तसेच बोरद जि. प. गटात उमेदवार नंतर जाहीर करण्यात येईल. तऱ्हावद / छोटा-धनपुर पंचायत समिती गणात काँ. अनिल ठाकरे, बोरद गणात श्रमिका चव्हाण हे उमेदवार जाहीर झाली आहे. तर मोड, आमलाड व धनपुर गणात उमेदवारांची चाचपणी सुरू असून नंतर उमेदवारांची नांवे जाहीर करण्यात येणार आहे.
बैठकीस माकप जिल्हा सचिव शामसिंग पाडवी, तालुका सचिव अनिल ठाकरे, जिल्हा कमिटी सदस्य सुदाम ठाकरे, जिल्हा सचिव मंडळ सदस्य रुबाबसिंग ठाकरे, तालुका कमिटी सदस्य दयानंद चव्हाण, तालुका कमिटी सदस्य कैलास चव्हाण, तालुका कमिटी सदस्य सुभाष ठाकरे, तालुका कमिटी सदस्य अंबालाल गुरव, तालुका कमिटी सदस्य अंकिता ठाकरे, तालुका कमिटी सदस्य ओमनीबाई वसावे, तालुका कमिटी सदस्य रमण पवार, तालुका कमिटी सदस्य देवीसिंग पाडवी, तालुका कमिटी सदस्य उखड्या ठाकरे, तालुका कमिटी सदस्य मनोहर साळवे आदी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments