गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त आ. राजेश पाडवी यांनी तळोदा तालुक्यातील रांझणी येथील गोशाळेला भेट देऊन गोपूजन केले. यावेळी आ.पाडवी यांच्यासह भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी व विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी यांच्या हस्ते गो शाळेतील गाईंना चारा भरवून गोमतेलाअभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष आंबालाल साठे, भाजपा ओबीसी मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, जाणता राजा बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष योगेश मराठे, भूषण क्षत्रिय आदी उपस्थित होते. यावेळी आ. राजेश पाडवी यांनी राज्यात गोमातेचे संगोपन, संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी महायुती शासनाच्या काळात गोमातेला राज्यमातेच्या दर्जा देण्यात आला असून यासाठी स्वतंत्र आयोग देखील स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोमाताचे निसिम गोभक्त असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. शिवाय राज्यात सर्वत्र शुद्ध देशी गोवंश व संवर्धन दिन साजरा होत असल्याने याठिकाणी गोमातेचे पूजन केल्याचे सांगितले. दरम्यान रांझणीतील श्रीकृष्ण गोशाळाही तालुक्यातील एकमात्र गोशाळा आहे.या ठिकाणी गोमातांचे अतिशय उत्कृष्ट संगोपन केले जात असल्याचे बघून श्रीकृष्ण गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष आनंदा मराठे, व्यवस्थापक धनराज मराठे व सचिव अभिमन्यू चव्हाण(पिनू भवर) यांचे आ.पाडवी यांनी कौतुक केले.यावेळी भाजपा ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रल्हाद बोराणे,युवा शेतकरी गणेश बोराणे, गोपाल कोळी, ईश्वर गोसावी, मोहन जाधव,बहादुर ठाकरे, गौरव पाटील, अमोल कोळी,ओम भारती, शुभम भारती, देवीसिंग पाडवी, भुरा पाडवी आदि उपस्थित होते.
शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त रांझणीच्या श्रीकृष्ण गोशाळेत आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन!
July 22, 2025
0
शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त रांझणीच्या श्रीकृष्ण गोशाळेत आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन!
तळोदा तालुक्यातील रांझणी येथिल श्रीकृष्ण गोशाळेत शुद्ध देशी व गोवंश जतन व संवर्धन दिनानानिमित आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. यावेळी आ.पाडवी यांनी श्रीकृष्ण गोशाळेची पाहणी करत गो शाळेतील उत्कृष्ट व्यवस्थापनाने कौतुक केले.
Tags

Post a Comment
0 Comments