अक्कलकुवा तालुक्याची आरोग्यमार्गे सकारात्मक वाटचाल – एका दिवसात ४ रक्तदान शिबिरे यशस्वीरीत्या संपन्न!
नंदुरबार | 1 जुलै
नंदुरबार जिल्हा निर्मिती दिन, राष्ट्रीय डॉक्टर दिन, महाराष्ट्र कृषी दिन आणि सिकलसेल रुग्णांसाठी आवश्यक रक्तसाठा वाढवण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यात एका दिवसात तब्बल ४ रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाने अक्कलकुवा तालुक्याने आपलाच मागील दोन वेळांचा ३ रक्तदान शिबिरांचा विक्रम मोडत आरोग्यदृष्टिकोनातून एक नवी, सकारात्मक ओळख निर्माण केली आहे.
एकाच दिवसात आयोजित केलेली ४ शिबिरे:
Y.R. पब्लिक स्कूल, रेठी (खापर, अक्कलकुवा)
तहसील कार्यालय, अक्कलकुवा
पंचमुखी हनुमान मित्र मंडळ, सोरापाडा (अक्कलकुवा)
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सोरापाडा (अक्कलकुवा)
या सर्व शिबिरांमध्ये नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
यामध्ये पुढील मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले: डॉ. विनय सोनवणे – जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार, डॉ. नरेश पाडवी – अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. जर्मनसिंग पाडवी – वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकुवा, डॉ. सुलोचना बागुल, डॉ. रमा वाडीकर – BTO, जिल्हा रक्तपेढी, मधुसूदन वाघमारे – ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जयेश सोनवणे – रक्तपेढी तंत्रज्ञ, जिल्हा रक्तपेढी
तसेच, अक्कलकुवा तालुक्यातील सर्व रक्तदान शिबिर आयोजकांचे, स्वयंसेवक व दात्यांचे या यशात मोलाचे योगदान राहिले. या चारही शिबिरांचे यश सामूहिक प्रयत्न, नियोजन आणि समर्पित आरोग्य यंत्रणा यांच्यामुळे शक्य झाले.
कुपोषण आणि सिकलसेलसारख्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या अक्कलकुवा तालुक्याने या उपक्रमातून आरोग्यदृष्टिकोनात “नकारात्मक” ची जागा “सकारात्मक” ओळखीने घेतली आहे.
हा एक आदर्श ठरावा अशा उपक्रमाबद्दल सर्व रक्तदात्यांना, आरोग्य सेवकांना आणि आयोजकांना मनःपूर्वक अभिनंदन!
.
.
.
#AkkalkuwaRaktdan #BloodDonationCamp #NandurbarDistrictDay #PositiveChange #SickleCellAwareness #HealthFirst #DoctorsDay #AkkalkuwaLeads #RaktdanMahadan



Post a Comment
0 Comments