पतंजली योग समितीतर्फे गुरुपूजन
नंदुरबार(प्रतिनिधी शहरातील टेलिफोन काॅलनीत सामाजिक सभागृहात नंदुरबार जिल्हा पतंजली योग समितीतर्फे गुरु पौर्णिमा निमित्त गुरु पूजन करण्यात आले.सर्वसाधकांनी उपस्थित राहून महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
याप्रसंगी एन.डी.माळी, नवनीत शिंदे, वसंत पाटील,आशिष पावरा,अजयसिंह गिरासे व सौ.मंगला गिरासे,किरण राजपूत, रचना रघुवंशी, किशोर भावसार, कैलास सुर्यवंशी,भास्कर रामोळे,अंकुश वसावे, विनोद सैंदाणे, रमण पाटील, दिपक सोनवणे तसेच रघुकुल नगर येथील नित्य योग वर्गातील सर्व साधक,मुख्य योग शिक्षक, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments