नेमसुशिल शैक्षणिक समूहातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
तळोदा :- शहरातील नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष यश संपादन केले आहे.
त्यात इयत्ता अमृता दशरथ करांडे, दक्ष जगदीश पाटील, मोक्षदा नितीन शिंपी, योगिनी सुनिल परदेशी, गौरी प्रशांत शिंपी या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड करण्यात आली आहे. त्यांना वर्गशिक्षक अरुण कुवर सचिन पंचभाई प्रतिभा बैसाणे गीतांजली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांच्या यश निवडीबद्दल संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखिया, संचालिका सोनाभाभी तुरखिया, उपाध्यक्ष डी.एम.महाले, सचिव संजयभाई पटेल, संस्था समनव्यक हर्षिल तुरखिया, मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल, प्राचार्य सुनिल परदेशी, प्रिन्सिपल पी.डी. शिंपी, उप-प्राचार्या कल्याणी वडाळकर, लिपिक नितीन भामरे, शैलेंद्र पाटील, समाधान मराठे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments