विद्या गौरव स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आमलाड येथे गुरुपौर्णिमा विविध कार्यक्रम संपन्न
तळोदा: विद्या गौरव प्रायमरी ,गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल व ज्युनिअर कॉलेज आमलाड यांच्या संयुक्त विद्यमाने येथे गुरुपौर्णिमा दिवसानिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेचे मार्गदर्शक ललित पाठक हे प्रमुख पाहुणे होेते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वास पवार हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांकडून आपल्या गुरूंची म्हणजेच शिक्षकांची पूजा करण्यात आली.त्यानंतर इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेवुन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षिका आरती यादव यांनी केले तसेच प्रस्तावना शाळेच्या शिक्षिका सारिका शिंदे यांनी केली. शाळेचे शिक्षक किरण वसावे व निलेश ढोडरे व श्रीमती समीक्षा मगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,व शेवटी शाळेचे शिक्षिका रंजना शिंदे यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments