माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे शैक्षणिक साहित्य वाटप
तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात उपक्रमशील शिक्षक पंकज खेडकर यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ पानपाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मार्फत विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी आनंदभाऊ पानपाटील यांनी सांगितले की, आपण वाढदिवसानिमित्त इतर अनेक ठिकाणी आनंद साजरा करण्यापेक्षा एक सामाजिक बांधीलकी म्हणुन गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहन दिले तर ते अधिक प्रेरणादायी ठरते. सर्पमित्र राहुल कोळी यांनी सापाच्या विविध प्रजातिविषयी माहिती दिली. तसेच वन्यप्राणीचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
यावेळी मुख्याध्यापक उमेश पाटील यांनी आनंदभाऊ पानपाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. समाजोपयोगी काम करण्यासाठी मोठे मन, किंवा इच्छाशक्ती असावी लागते. असे सांगितले.
यावेळी आनंद पानपाटील, कुणाल भावसार, चेतन चौधरी तसेच राहुल कोळी सर्पमित्र हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढोडरे यांनी केले. तर आभार खेडकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मगरे, भील, पाडवी , साळुंखे , जांभोरे तसेच राठोड भाऊसाहेब, मोहन वळवी, सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment
0 Comments