रांझणी कृषि विद्यालयाचा कृषि तंत्र पदविका परीक्षेचा निकाल जाहीर प्रथम वर्षाचा ९४.१२ टक्के तर द्वितीय वर्षाचा ९१.६७ टक्के निकाल
तळोदा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयाचा मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व द्वितीय वर्षाचा वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात प्रथम वर्षाचा ९४.१२ टक्के तर द्वितीय वर्षाचा ९१.६७ टक्के निकाल लागला आहे.
यात प्रथम वर्षात शर्मिला बाज्या पाडवी ८२.४२ टक्के गुण मिळवून प्रथम, ओली मोवाऱ्या ८२.०८ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर पिंकु सुरेश वसावे ७८.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. तर द्वितीय वर्षात संजय उत्तम पावरा ७५.९६ टक्के गुण मिळवून प्रथम, तर जयराम जामसिंग वसावे ७५.७५ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर अजित संतोष पराडके ७५.७१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच द्वितीय वर्षात प्रथम श्रेणी विशेष प्राविण्यात ०३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३९ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार जैन, सचिव घनश्याम चौधरी, संचालक कुुमारपाल जैन, प्राचार्य प्रफुल्ल पाटील, प्रा.प्रविण वसावे, प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, संगिता वसावे, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments