शेजवा बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती, कृषि दिनानिमित्त परसबागेत फळ भाज्यांची लागवड
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त व कृषी दिवस म्हणून परसबागेत फळ भाज्यांची लागवड करून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी एस पाटील हे होते त्यांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेच्या आवारात शालेय पोषण आहार अंतर्गत परसबाग मध्ये वांगी, टोमॅटो, मिरची दुधी, कडीपत्ता व कोथिंबीर इ.फळभाज्यांची लागवड करण्यात आली तसेच कृषी दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
यावेळी शाळेचे क्रीडा शिक्षक विजय पवार, उपशिक्षक दीपक वळवी, रामानंद बागले, संजय बोरसे , कलाशिक्षक आनंदराव पवार, संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले, लिपिक श्रीमती नेहा शर्मा यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेची शिपाई संजय वसावे दिनेश पवार समीर वसावे यादीने परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Post a Comment
0 Comments