मानव विकास मिशनतर्फे मुलींना देण्यात येणाऱ्या सायकल वाटपाची तपासणी.
तळोदा, दि. ३ जुलै: मानव विकास मिशन अंतर्गत गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप योजनेची धुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तळोदा तालुक्यातील सोमावल येथील दुधाबाई पाडवी माध्यमिक विद्यालयात पाहणी केली. ३ जुलै रोजी ही तपासणी करण्यात आली.
मानव विकास मिशनचा उद्देश शाळेतील मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी सुलभता यावी यासाठी मोफत सायकली प्रदान करणे आहे. या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी जिल्हा नियोजन अधीक्षक सुनीता उदय वाघ (धुळे) आणि सांख्यिकी सहाय्यक अधिकारी निखिल पाटील (धुळे) यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट दिली.
यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना सायकली मिळाल्या आहेत की नाही याची चौकशी केली. आणि त्यांच्याशी संवाद साधला. शाळेचे मुख्याध्यापक भास्कर मराठे, पर्यवेक्षक विलास बैसाणे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या तपासणीमुळे योजनेची पारदर्शकता आणि गरजूंपर्यंत लाभ पोहोचत असल्याची खात्री पटण्यास मदत झाली.

Post a Comment
0 Comments