शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे रक्तदान व अवयव दान जनजागृती उपक्रम
नंदुरबार | 27 जून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार यांच्या पुढाकाराने व स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नंदुरबार आणि नवापूर शाखांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरांद्वारे रक्तदानासोबत अवयव दान विषयक सामाजिक जागरूकतेचा प्रचारही प्रभावीपणे करण्यात आला.
या शिबिरात एस बी आय नंदुरबार शाखा येथे दि. 27 जून एकूण रक्तदातेनीं रक्तदान केले 36 बॅग्स रक्त संकलन केले. एस बी आय नवापूर शाखाच्या वतीने दि. 26 जून रोजी रकतदांन शिबिरात 41 रक्त बॅग्स संकलन केले.
या उपक्रमात सहभागी कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना "मृत्यूनंतर अवयव दानाचे महत्त्व" सांगणारे मार्गदर्शन करण्यात आले. यकृत, हृदय, नेत्र आणि मूत्रपिंड यांसारख्या अवयवांचे दान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतात, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. जागरूकतेसाठी माहितीपत्रके, व्हिज्युअल पोस्टर आणि संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात SBI बँकेच्या अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर, स्टाफ, रक्तपेढी व स्वयंसेवकांची विशेष मदत लाभली.
हा उपक्रम शारीरिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा अनोखा संगम होता. रक्तदान व अवयव दान ही जीवन वाचवणारी देणगी आहे, हे जनमानसात रुजवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचा हा पुढाकार निश्चितच अनुकरणीय आहे.
.
.
.
#NandurbarCares #DoctorsDay2025 #BloodDonationDrive #OrganDonationAwareness #SBIBloodCamp #GovernmentMedicalCollege #ServeToSave #DonateBlood #DonateOrgans #LifeSaverInitiative

Post a Comment
0 Comments