ग्रामीण विद्यार्थिनींसाठी सशक्त पाऊल – क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड व क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशनच्या ' ग्रामीणविद्या' शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत नंदुरबारमधील 4 विद्यार्थिनींना गौरव
नंदुरबार | धुळे विभाग क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड व त्यांच्या CSR विभागातील क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा ‘Grameen Vidya’ शिष्यवृत्ती उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील चार गुणवंत विद्यार्थिनींना विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
या वेळी कोमल मंडलिक, मानसी गोयकर, यामिनी वासईकर, अक्षरा चव्हाण या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. या चार विद्यार्थिनींनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
सीएसआर उपक्रमामागील उद्दिष्ट:
‘ग्रामीण विद्या’ या शिष्यवृत्तीचा उद्देश आर्थिक दुर्बल घटकातील हुशार मुलींच्या शिक्षणाला चालना देणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे हा आहे. या उपक्रमामुळे केवळ शैक्षणिक मदतच मिळत नाही तर ग्रामीण भागातील पालक व समाजातही शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो.
या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य बाबालू पिंजारी (AM), दीपक कदम (AM), अवेश पटेल (SBM), महेंद्र सदावर्ते (ABM), दादाभाऊ कोळी (TKM) या टीमने नंदुरबार भागात विद्यार्थिनींची ओळख, निवड आणि शिष्यवृत्तीचे वितरण अतिशय काटेकोरपणे पार पाडले.
‘Grameen Vidya’ हा CSR अंतर्गत राबवला जाणारा एक आश्वासक सामाजिक उपक्रम ठरत आहे जो गावातल्या प्रत्येक हुशार मुलीच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम करतो. नंदुरबार जिल्ह्यासाठी हे एक अभिमानास्पद पाऊल असून, यामुळे भविष्यात अजून अनेक ग्रामीण विद्यार्थिनी शिक्षणात पुढे येतील.
.
.
.
#GrameenVidya #ScholarshipForGirls #CSRInitiative #CreditAccessGrameen #NandurbarGirlsShine #EducationEmpowers #GirlChildEducation #NandurbarRising #PartnershipForProgress





Post a Comment
0 Comments