Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

21 जुलै पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना सादर कराव्यात - डॉ. मित्ताली सेठी

 21 जुलै पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना सादर कराव्यात

- डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार, दिनांक 14 जुलै, 2025 (जिमाका) :

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबतची अधिसूचना जारी केली असून प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना असल्यास 21 जुलै 2025 पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


या प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्याची प्रत खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे:

• जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयातील सूचना फलक. 

• जिल्हा परिषद नंदुरबार कार्यालयातील सूचना फलक. 

• अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर येथील तहसीलदारांच्या कार्यालयांमधील सूचना फलक. 

• अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर येथील पंचायत समित्यांच्या कार्यालयांमधील सूचना फलक. 


या मसुद्यावर कोणालाही काही हरकती किंवा सूचना असल्यास, त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना जिल्हाधिकारी नंदुरबार किंवा संबंधित तहसीलदार (अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार व नवापूर) यांच्याकडे 21 जुलै, 2025 पर्यंत सादर कराव्यात. नंतर प्राप्त झालेली कोणतीही निवेदने, हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



Post a Comment

0 Comments