अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मूळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मिडियम स्कूल व बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी बार्टीचे तालुका समन्वयक प्रमुख पाहुणे ब्रिजलाल पाडवी होते तर अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्यध्यापक गोटूसिंग वळवी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आदिवासी कुलदैवत याहा मोगी मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे यांनी केली. त्यात त्यांनी मृदा संधारण व शेती व्यवसाय वर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ब्रिजलाल पाडवी यांनी पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गोटूसिंग वळवी यांनी पर्यावरणीय समतोल काळाची गरज तसेच वृक्ष लागवडीवर प्रकाश टाकला. त्यानंतर विद्यार्थ्यांची झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेला अनुसरून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. त्यानंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका मनीषा वसावे, मथुरा वसावे, शेवंती वसावे, शीतल वसावे, लक्ष्मी वसावे, हीराबाई वसावे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनीषा वसावे तर आभार लीला पाडवी यांनी मानले.




Post a Comment
0 Comments