डुप्लिकेट दाखले काढणाऱ्या सायबर कॅफेला पूर्वसूचना देऊन कारवाई करावी ग्राहक पंचायतीची मागणी
धडगाव तालुक्यातील डुप्लिकेट दाखले काढणाऱ्या सायबर कॅफेला पूर्वसूचना देऊन कारवाई करा व रेशनकार्डच्या फॉर्मला जोडलेल्या उत्पन दाखल्याची पडताळणी करा-अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणीकरण्यात आली आहे.
शासकीय संबंधित योजनेच्या फॉर्म भरण्यासाठी उत्पन्न दाखले व इतर दाखले आवश्यक असतात परंतु काही खाजगी सायबर कॅफे वरून डुप्लिकेट उत्पन्न दाखले व इतर दाखले काढून देतात व लाभार्थ्यांची दिशा भूल करतात ह्या मुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात हिच बाब लक्षात घेता धडगाव तालुक्यातील प्रत्येक सायबर कॅफेवर पूर्वसूचना देऊन डुप्लिकेट दाखले काढून देणाऱ्या सायबर कॅफेवर कारवाई करणे तसेच सध्या रेशनकार्डचे फॉर्म भरणे सुरू आहे त्या फॉर्मला जोडलेल्या उत्पन्न दाखल्याची पडताळणी करण्याची मागणी अक्राणी तालुक्याचे तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अक्राणी यांनी केली आहे.यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अक्राणी तालुका अध्यक्ष जितेंद्र दिलीप ढोले यांनी म्हटले की,उत्पन्न दाखले व इतर शासकीय,शैक्षणिक कामासाठी लागणारी महत्त्वपूर्ण कागदपत्रे सेतू केंद्र,आपले सरकार केंद्रातून काढावीत जेणेकरून लाभार्थ्यांना शासनाचा लाभ घेण्यास कुठल्याही अडचणी येणार नाहीत.
*निवेदनाची दखल घेतली जाईल व डुप्लिकेट दाखले काढून देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच लाभार्थ्यांनी जोडलेल्या प्रत्येक दाखल्याची पडताळणी करूनच लाभार्थ्यांला पात्र ठरविण्यात येईल.डुप्लिकेट दाखले जोडून शासकीय योजनेच्या लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येईल.*
ज्ञानेश्वर सपकाळे(तहसिलदार अक्राणी)

Post a Comment
0 Comments