शाळेच्या परिसरात पाण्याचा साठा; पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची कसरत
तळोदा – नेम सुशील विद्या मंदिर परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना शाळेत ये-जा करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पालक आपल्या मुलांना हात धरून किंवा उचलून शाळेपर्यंत नेत आहेत. पाण्यातून चालताना विद्यार्थ्यांचे कपडे, बूट भिजत असून त्यामुळे दिवसभर त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळेतील शिक्षकांनाही शाळेत पोहोचताना तसेच परिसरात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते, मात्र अद्याप प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पालक आणि शिक्षकांनी यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.


Post a Comment
0 Comments