Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आश्रमशाळेतील परिचारिका भर्तीवर बिरसा फायटर्सचा आक्षेप! ठेकेदाराऐवजी शासकीय यंत्रणेमार्फत भरती करा- बिरसा फायटर्स

 आश्रमशाळेतील परिचारिका भर्तीवर बिरसा फायटर्सचा आक्षेप!

ठेकेदाराऐवजी शासकीय यंत्रणेमार्फत भरती करा- बिरसा फायटर्स

नंदूरबार प्रतिनिधी:-आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत जिल्ह्य़ात ७४ परिचारिका नियुक्तीची प्रक्रिया ही ठेकेदार खाजगी यंत्रणेऐवजी शासकीय यंत्रणेमार्फत राबवा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,बिलीचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

                     राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणा-या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थांची काळजी घेण्यासाठी ४९९ परिचारिका भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. नंदूरबार जिल्ह्य़ात नंदूरबार व तळोदा प्रकल्पांतर्गत एकूण ७४ परिचारिका नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी प्रक्रिया राबविली जात आहे.७४ जागांसाठी एकूण ९ हजार अर्ज आले आहेत.त्यामुळे भरती प्रक्रिया राबविणारी ठेकेदार खाजगी यंत्रणा ही उमेदवारांकडून पैशांची मागणी करून जो जास्त पैसे जास्त देईल  त्याला नियुक्तीपत्र देणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्य़ात स्थानिक युवतींना प्राधान्य देण्यात येणार आहे.तरी उमेदवार अधिक असल्या कारणास्तव उमेदवारांस नियुक्तीपत्र देतांना मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून ही भरती प्रक्रिया खाजगी ठेकेदार ऐवजी सरकारी यंत्रणेमार्फत गुणवत्तेनुसार राबविण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments