क्रांतिवीरांचे विचार व कर्तृत्व युवा पिढीत रुजविणे गरजेचे.- राजेंद्र पाडवी
सांगली: धरतीआबा बिरसा मुंडा यांचा स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा किसन अहिर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय वाळवा जि.सांगली येथे माजी प्राचार्य एस.ए.गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पाडवी म्हणाले की,भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिविरांचे विचार व कार्यकर्तृत्व युवा पिढीत रुजविणे गरजेचे आहे.बिरसा मुंडांनी जंगलात जे मिळेल ते खाऊन वैचारिक जनजागृती करून आदिवासींवरील अन्याय,शोषण,न्यायिक हक्कासाठी व जल,जंगल,संपत्तीसाठी इंग्रज,सावकर,जमीनदार यांच्याविरुद्ध 'उलगुलान'केले.भरकटत चाललेल्या युवा पिढीत वैचारिक सामाजिक विचार रुजविणे आवश्यक आहे.असे बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष व 'उलगुलान' पुस्तकाचे लेखक राजेंद्र पाडवी यांनी केले.
यावेळी प्राचार्य व्ही.बी.पाटील,पर्यवेक्षक विलास शेटे,विकास शिंदे,शंकर वडर,अनिल यादव,धनाजी जाधव,दिलीप माळी,इंद्रायणी पवार,नितीन कांबळे,एम.एस.कोळी,श्रीधर कांबळे व मोठ्या संख्येने विदयार्थी उपस्थित होते.प्रस्तावना निलम जगताप तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.



Post a Comment
0 Comments