आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकाराने “शहादा व तळोदा शहरांना मिळाली शववाहिनीची सुविधा…
शहादा/तळोदा (प्रतिनिधी) –
सामान्य नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत, नेहमीच जनतेसाठी झटणारे शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राजेश पाडवी यांनी शहादा आणि तळोदा शहरांसाठी प्रत्येकी एक शववाहिनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे अधिकृत मागणी सादर केली होती.
आमदार राजेश पाडवी यांनी स्पष्ट केले की, शववाहिनीच्या अभावामुळे शहादा व तळोदा शहरातील नागरिकांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन्ही नगरपालिकांसाठी शववाहिन्या तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.
या मागणीमुळे दोन्ही शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, मृत्यू पश्चात सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणारी अत्यावश्यक सुविधा आता त्यांच्या दारी येणार आहे.
या निर्णयाचे शहादा व तळोदा शहरातील सर्वच स्तरातून स्वागत होत असून, नागरिकांनी आमदार पाडवी यांचे आभार मानले आहेत. सामाजिक संस्थांनीही या निर्णयामुळे अंत्यसंस्कारात होणारा त्रास कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Post a Comment
0 Comments