निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत उन्हाळी शिबीर २०२५ – नंदुरबार जिल्ह्यात अभिनव शैक्षणिक उपक्रम
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने उन्हाळी शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
जी प मुख्य कार्यकारी अधिकारी सावणकुमार यांच्या प्रेरणेने व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इ. ३ री ते ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सलगता कायम ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शिबिराचे उद्दिष्ट:
विद्यार्थ्यांमध्ये वाचन व गणित विषयातील कौशल्य वृद्धिंगत करणे
खेळ, गोष्टी, कृती-आधारित शिक्षण, गटचर्चा, लेखन व समस्या सोडवण्याचे उपक्रम यांद्वारे आनंददायी शिक्षण अनुभव देणे
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीतील सातत्य टिकवणे
स्वयंसेवकांचा सक्रीय सहभाग:
१ मे २०२५ पासून सुरू असलेल्या शिबिरांमध्ये जिल्ह्यात १५५७ स्वयंसेवकांची नोंदणी झाली असून ते गावपातळीवर प्रभावीपणे शिबिरे राबवत आहेत.
स्थानिक युवक, युवक-युवती, पालक आणि शिक्षक यांचा उल्लेखनीय सहभाग आहे.
तांत्रिक सक्षमता:
स्वयंसेवकांना Google Suite व इतर डिजिटल टूल्सचे प्रशिक्षण दिले जात आहे.
Education for Education (EFE) कोर्सेस WhatsApp च्या माध्यमातून स्वयं-अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले जात आहेत.
शिक्षक प्रशिक्षण – NEP 2020 अनुषंगाने:
२ जून ते १३ जून २०२५ या कालावधीत इ. १ ली शिकवणाऱ्या शिक्षकांना पुनर्रचित अभ्यासक्रमाचे CBSE पॅटर्ननुसार प्रशिक्षण देण्यात आले.
प्रत्येक तालुक्यात 3 दिवसांचे दोन बॅचेस घेण्यात आले असून प्रशिक्षणाचे आयोजन डायट नंदुरबार व शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले.
शाळा प्रवेश उत्सव २०२५:
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळा प्रवेश उत्सवाचे उत्साही आयोजन करण्यात आले असून सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पालक यांना शाळा भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सहभागी संस्था व यंत्रणा:
ग्रामपंचायत, शाळा प्रशासन व प्रथम संस्था यांचा अभियानात सक्रीय सहभाग.
शिक्षण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक नियमितपणे शिबिरांना भेटी देत आहेत.
निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवणाऱ्या पातळीवर सक्षम बनविणे आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग याचा प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहे.
.
.
.
#NipunMaharashtra #SummerCamp2025 #ZPNandurbar #EducationForAll #ShikshanVibhag #EFeCourses #PrathamFoundation #DigitalLearning #SchoolEducation #NEP2020







Post a Comment
0 Comments