खड्या पडून वर्ष उलटले;रस्ता डांबरीकरण होईना
( असली ते माथा असली-अस्तंबा रस्ता)
लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष.
तळोदा :वर्षानुवर्षे बुंदे असली ते माथा असली-अस्तंबा ता.धडगाव रस्ता नादुरुस्त आहे.मुख्य रस्त्यापासून अवघे ५ ते ६ कि.मी. पर्यत असलेला हा रस्ता अस्तंबा देवस्थानाकडे जातो.उतार व वळणदार रस्ता असल्याने पावसाळ्यात मोटार सायकल वरून जाणे जिकरीचे होते.अनेकजन पडून दुखापत सुद्धा झाले आहेत.
वर्ष उलटूनही रस्त्याचा कडेला खड्या पडून आहे.परंतु,रस्ता डांबरीकरण होत नाही;हे दुर्दैव.देवस्थानाकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने ग्रामस्थ डांबरीकरण कधी होईल, याची प्रतीक्षा आहे.काही दिवसापूर्वी बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी माथा असली येथे लग्न कार्यक्रमानिमित्त गेल्यावर काही ग्रामस्थांनी त्यांच्या समोर गाऱ्हाणे मांडले.संबंधित विभागाला जाब विचारून प्रश्न सोडविण्यात येईल असे राजेंद्र पाडवी यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments