डायटच्या प्राचार्यानी साधला प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण
तळोदा : येथील विद्यागौरव इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सुरू असणाऱ्या वरिष्ठ वेतनश्रेणी व वेतनश्रेणी प्रशिक्षणाला जिल्हा समन्वयक तथा डायटचे प्राचार्य डॉ.राजेंद्र महाजन यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षक म्हणून १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी तर 24 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण राज्यात २ जून ते १२ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारच्या वतीने अंतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणाला देखील २ जून पासून सुरुवात झाली.
तळोदा येथे विद्यागौरव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील शिक्षक प्रशिक्षणाच्या पाचव्या दिवशी डायटचे प्राचार्य डॉ.राजेंद्र महाजन यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी गटाला भेट देवून प्रशिक्षणार्थीचा प्रतिसाद जाणून घेतला.यावेळी त्यांनी हे प्रशिक्षण प्रमाणपत्रासाठी नाही तर २१ व्या शतकात शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार असून त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सोबत डायट ही जिल्हाची शिक्षण क्षेत्राची मातृसंस्था असून शिक्षक हे मातृसंस्थेचे घटक असल्याचे सांगितले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे व तांत्रिक समस्यांमुळे तळोदासह राज्यात प्रशिक्षणात व्यत्यय निर्माण झाला होता.त्यानंतर तांत्रिक बाबींवर लक्ष न देता प्रशिक्षण नियोजनबद्ध व शिस्तबद्ध सुरू असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक प्रा. विनोद लवांडे यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेंद्र महाजन यांना केंद्रावर झालेल्या कार्यवाही व प्रशिक्षणाची माहिती दिली.याप्रसंगी सुलभक प्रा.भावना गोसावी, पी.आर.वळवी,सुजाता साळवे,डी.बी.पाटील, सुवर्णा सोलंकी,मेघ:श्याम धनगर,पी.एम.वानखेडे,डॉ.कामिनी पवार, जालामसिंग पवार, जितेंद्र मगरे,रविंद्र गुरव,सचिन पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, दिपक शेंडे,आदीं उपस्थित होते.





Post a Comment
0 Comments