अंनिसच्या जिल्हा बैठकीत विविध विषयांवर चर्चा
तळोदा : येथे आयोजित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीची बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आले.
बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य प्रधान सचिव विनायक सावळे,राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे, प्रशिक्षण विभाग राज्य कार्यवाह किर्तीवर्धन तायडे, अंनिप पत्रिका संपादक मंडळ सदस्य हंसराज महाले,वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह रवींद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी,जिल्हा प्रथम सचिव रायसिंग पाडवी,मुकेश कापुरे, प्रा.डॉ.प्रशांत बोबळे, सुवर्णा जगताप,तळोदा शाखेचे अध्यक्ष प्रा.जयपालसिंग शिंदे,आदी उपस्थित होते.
बैठकीत सुरुवात तिला शहादा येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारणी बैठकीच्या अहवाल मांडण्यात आला. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष व प्रधान सचिव यांनी निवेदन केले. बैठकीला उपस्थित शहादा,तळोदा,नंदुरबार, मोलगी,नवापूर,कळंबू,कोठडा, अक्कलकुवा,चिंचपाडा इत्यादी शाखांच्या कामकाजाच्या अहवाल शाखेच्या कार्याध्यक्षांनी सादर करण्यात आला. त्यानंतर बैठकीत पुढील चार महिन्याच्या कामकाजाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.यावेळी युवा व महिला सहभाग वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांची व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या निर्णय घेण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना विनायक सावळे म्हणाले की,आपली बांधिलकी ही विचारांशी आहे. आपल्या त्यागातून व समर्पणातून संघटना प्रतिकूल परिस्थितीत उभी आहे वाढत व विस्तारत आहे. कामाच्या विविध क्षेत्रात मोठी आव्हाने असून प्रचंड संधी देखील आहे.ती पेलण्यासाठी आपण आपल्या क्षमता अधिक विकसित केल्या पाहिजेत. राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे यांनी राज्य निरीक्षक म्हणून भूमिका बजावली.प्रा.शिंदे यांनी आजच्या प्रतिकूल परिस्थितीत पुरोगामी परिवर्तनवादी विचारांची समाजाला नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादित केले.
बैठकीला जिल्ह्यातील सर्व शाखांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार सुनील पिंपळे यांनी केले.
नवनियुक्त राज्य पदाधिकाऱ्यांच्या सत्कार
शहादा येथे नुकतेच पार पडलेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातून विनायक सावळे (राज्य प्रधान सचिव), किर्तीवर्धन तायडे यांची प्रशिक्षण विभाग राज्य कार्यवाहपदी,हंसराज महाले यांची अंनिप पत्रिका संपादक मंडळ सदस्य, रविंद्र पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह यांची राज्य कार्यकारणीवर निवड करण्यात आली.तळोदा येथे आयोजित जिल्हा बैठकीत राज्य कार्यकारणीवर निवड करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा कार्यकारणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील लक्षवेधी कार्यकर्ता व शतकवीर कार्यकर्त्यांना देखील बैठकीस सन्मानित करण्यात आले. तळोदा शाखेला लक्षवेधी पुरस्कार मिळाल्याबद्दल कार्याध्यक्ष सुनील पिंपळे यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.


Post a Comment
0 Comments