अंमलपाडा येथे पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
तळोदा तालुक्यातील अंमलपाडा येथे जागतिक पर्यावरण दिन निमित्त नमामि सातपुडा मिशन व जलसाक्षरता समिती नंदुरबार च्या वतीने विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात यशवंत वळवी यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत सखोल माहिती दिली.
मार्गदर्शन करताना त्यांनी प्लास्टिकचा निसर्ग, प्राणी, आणि मानवी आरोग्यावर होणारा परिणाम सोप्या उदाहरणांद्वारे स्पष्ट केला. "प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारा कचरा भविष्यासाठी गंभीर संकट निर्माण करू शकतो," असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सेंद्रिय, पुनर्वापरयोग्य व स्थानिक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर 65 विद्यार्थ्यांनी "मी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करेन" अशी शपथ घेतली. टाकावु प्लास्टिकचे संकलन केले.

Post a Comment
0 Comments