तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रतिसाद लाभला
तळोदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सायंकाळी पार पडली. या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह दिसून आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
येत्या चार जूलै 2025 रोजी प्रदेशाध्यक्ष तथा खा. सुनिलजी तटकरे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा असल्याने त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मोहन शेवाळे, सोशल मिडीया सेलचे जिल्हा अध्यक्ष छोटू कुंवर, तळोदा तालुका अध्यक्ष मगन ठाकरे, रामपूरचे सरपंच दीपक वळवी, माजी सभापती यशवंत ठाकरे, मोडचे सरपंच पुंडलीक राजपूत यांसह संदीप वळवी, सचिन ठाकरे, सांगदेव वळवी, विलास गावित, विजय मावची, फतू पाडवी, मधूकर ठाकरे, कुंवरसिंग मोरे, सुहास वळवी, युवराज अशोक वळवी, विकास ठाकरे, विशाल वळवी, शिवा पावरा, खुशाल पावरा, प्रशांत पट्लते, सांगदेव वळवी, रणसिंगभाऊ पाडवी, हूपसिंग सुरत्या नाईक, आंबूलाल वळवी, दिनेश वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय विश्राम गृहावर तब्बल दोन तास बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजितदादा मोरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यंदा अनुकुल वातावरण आहे. आपले नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, तसेच जिल्हयाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्याला लाभलेले आहेत.
आपला पक्ष हा सर्वधर्म समभाव मानणारा आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त परीश्रम घेवून आगामी जि प निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक मोहन शेवाळे यांनी केले. यावेळी दिपक दशरथ वळवी यांची युवक जिल्हाउपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ज्या इच्छुक उमेदवारांना रिंगणात उभे राहायचे आहे, अशा सर्व उमेदवारांनी आत्तपासूनच कामाला लागावे असेही आढावा बैठकीत ठरवण्यात आले.
#NCP #nandurbar #nandurbarsmartcity #ncpspeaksofficial






Post a Comment
0 Comments