बकरी ईद निमित्त अंनिसकडून रक्तदान सप्ताह
नंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार शाखेकडून बकरी-ईद सणाचे औचित्य साधून जिल्हा रूग्णालय, नंदुरबार येथे रक्तदान सप्ताहाची सुरूवात करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.नरेश पाडवी यांचेहस्ते रक्तदान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. बकरी ईद सण हा कुर्बानीचा संदेश देणारा सण असून यानिमित्त प्राण्यांची कुर्बानी न देता स्वतःच्या रक्ताची कुर्बानी अर्थात रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचू शकतो हा विधायक व पर्यावरण पूरक संदेश देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्याकडून मागील काही वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.नंदुरबार शाखेकडून हे रक्तदान शिबिराचे तिसरे वर्ष होते.
रक्त संकलन विभाग प्रमुख डाॅ रमा वाडेकर तसेच जयेश सोनवणे आणि कर्मचारीवृंद यांनी रक्तसंकलनाची प्रक्रिया पार पाडली.महा.अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी, नंदुरबार शाखा कार्याध्यक्ष सुर्यकांत आगळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य फिरोज खान,प्रविणकुमार धांदरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.यांनी रक्तदान केले.काही तांत्रिक आणि वैद्यकिय कारणास्तव इच्छा असुनही काही कार्यकर्त्यांना रक्तदान करता आले नाही.
यशस्वीतेसाठी नंदुरबार अनिस शाखेचे प्रधान सचिव बलदेव वसईकर,प्रवीण धनदरे,संदीपकुमार आखाडे,राजू चौधरी,पराग जगदेव,राजेंद्र पिंपळे,मंगेश वाघमारे,सुधीर पानपाटिल आदी सहकार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Post a Comment
0 Comments