शिवसेना उबाठा पक्षाचा जिल्हा युवा सेना मार्फत.... एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन...
नंदुरबार : एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात... या अभियानांतर्गत शासनाच्या विरोधात हिंदी सक्तीची न करण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाचा जिल्हा युवा सेना मार्फत येथे आज शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सह्या करून सहभाग नोंदविला.
शहरातील अंधारे चौकात शिवसेना उबाठा पक्षाचा जिल्हा युवा सेना मार्फत मराठी माणसांचा स्वाभिमान असलेल्या मराठी भाषेच्या सन्मान व्हावा तमाम महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा युवा सेना मार्फत शासनाने केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात...
हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात कार्यकर्त्यांसह विद्यार्थी व सुजाण नागरिकांनी सह्या करून सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, माजी नगरसेवक विनोद चौधरी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, महानगर प्रमुख पंडित माळी, शहर प्रमुख
राजधर माळी, जिल्हा संघटक
सुनील सोनार, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील,जिल्हा सचिव दिनेश भोपे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राहुल कोळी, वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष प्रकाश चौधरी, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक आनंदा पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राज पाटील, युवा सेना शहर प्रमुख दादा कोळी, युवा सेना शहर उपप्रमुख एजाज काजी शहर संघटक भक्तवत्सल सोनार, शिवसैनिक रोहित मराठे,
आयान खाटीक,राज राजपूत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सुजान नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments