Type Here to Get Search Results !

शेजवा येथे बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

 शेजवा येथे बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत सन 2025 26 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले.

                          कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींची ढोल ताशांच्या गजरात  शेजवा गावातून भव्य रॅली काढण्यात आली यात शिक्षणाच्या विविध अशा घोषणा देण्यात आल्या . त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींची रॅली शाळेत येऊन पोहोचली यावेळेस शाळेतील नवीन   प्रवेशित व इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक  डी. एस. पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

               यावेळी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते तसेच इयत्ता 5 वी ते  8 वीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी .एस. पाटील व गावातील मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक पाढ्यपुस्तक ,वह्या व पेन विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गोड मिष्ठान्न पोषण आहार बरोबर देण्यात आले. 

               यावेळी शाळेचे उपशिक्षक विजय पवार ,दीपक वळवी, रामानंद बागले हरून खा शिखलीकर, संजय बोरसे , आनंदराव पवार, संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments