अक्कलकुवा विधानसभा प्रभारी पदी आमदार राजेश पाडवी यांची निवड
तळोदा :- अक्कलकुवा विधानसभा प्रभारी पदी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांची भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मान्यतेने शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांची अक्कलकुवा विधानसभा प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्याकडून आमदार राजेश पाडवी यांना प्राप्त झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपली अक्कलकुवा विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार राजेश पाडवी यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत, आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने आपण सदैव प्रयत्नशील राहणार असून भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येय, धोरण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच पक्ष संघटन वाढीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आ. राजेश पाडवी यांनी सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments