शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोलगी डब अक्कलकुवा रस्त्यावर भूस्खलन प्रतिबंधासाठी उपाययोजना
मोलगी डाब अक्कलकुवा रस्त्यावर विविध ठिकाणी उतारभागाची झीज होऊन रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. सदर समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा यांच्यामार्फत भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
सर्वेक्षण व अभ्यास:
जिओलॉजिकल निरीक्षणे व टोपोग्राफिकल सर्व्हे करून स्थळ परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले.
भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजना:
✔️ उच्च दर्जाच्या सशक्त सिंथेटिक जिओमॅटसह हायड्रोसीडिंग
✔️ उतार भागावर पॅसिव्ह अँकर्ससह स्लोप रिइन्फोर्समेंट
✔️ खडकाळ भागात एचटीएस केबल नेट/मेशसह रॉकफॉल संरक्षण
✔️ उताराच्या पायथ्याशी गॅबियन रिटेनिंग वॉलसह पॅसिव्ह नेल्स
या संपूर्ण उपाययोजनांमुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षित राहणार असून, भविष्यातील नैसर्गिक आपत्तींना प्रभावी प्रतिसाद मिळणार आहे.
.
.
.
#PWDShahada #LandslideMitigation #InfrastructureDevelopment #GabionWall #SlopeStabilization #RoadSafety #PublicWorksDepartment #Nandurbar #MaharashtraDevelopment



Post a Comment
0 Comments