Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

हर्बल आरोग्याचा स्वाद – सचिन हाडस यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेला यशस्वी चहा व्यवसाय

 हर्बल आरोग्याचा स्वाद – सचिन हाडस यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेला यशस्वी चहा व्यवसाय

                  नंदुरबार जिल्ह्यातील युवक सचिन किसन हाडस यांनी कल्पकता, निरीक्षणशक्ती आणि स्वयंस्फूर्तीच्या जोरावर एक अभिनव आणि आरोग्यदायी हर्बल चहा पावडर रिपॅकिंग व्यवसाय उभा केला आहे.


उद्योजकीय प्रवास:

सचिन हाडस यांना एका प्रवासादरम्यान दार्जिलिंगमध्ये भेटलेल्या एका महिला उद्योजिकेने प्रेरणा दिली. त्या महिला युरोपमध्ये भारतीय चहा विकत होत्या, पण खऱ्या अर्थाने आरोग्यदायी हर्बल चहा नाही अशी त्यांची तक्रार होती. हेच विधान त्यांच्या मनात रेंगाळले आणि त्यांनी स्वतःच आरोग्यवर्धक चहा पावडर तयार करून स्थानिक उत्पादनातून जागतिक दर्जा गाठण्याचा संकल्प केला.


उदयोन्मुख कल्पना, आरोग्यदायी चहा:

सचिन हाडस यांच्या निरीक्षणात आले की बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश चहा पावडरमध्ये कृत्रिम फ्लेवर व इसेंस असतात, परंतु शरीरासाठी फायदेशीर अशी खरी हर्बल चहा उपलब्ध नाही. हीच उणीव संधी बनवून त्यांनी हर्बल वनौषधींच्या मिश्रणातून एक हेल्दी, प्रोटीनयुक्त, ऊर्जा देणारी चहा पावडर विकसित केली.


⦁ प्रकल्प नाव: हर्बल चहा पावडर रिपॅकिंग

⦁ प्रारंभिक गुंतवणूक: ₹10,00,000/-

⦁ वित्त सहाय्य: युनियन बँक ऑफ इंडिया, नंदुरबार

⦁ सध्याची वार्षिक उलाढाल: ₹25,00,000/-


विशेष म्हणजे त्यांनी या व्यवसायासाठी कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही. फक्त स्वतःची निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि बाजारातील गरज ओळखून त्यांनी उत्पादनाची रचना केली.


सुरुवातीला मर्यादित स्रोतांवर काम करून, स्वतः यंत्रणा उभी करून त्यांनी व्यवसायाला चालना दिली. आज त्यांचा व्यवसाय दरवर्षी २५ लाख रुपये उलाढाल करत आहे. यामध्ये स्थानिक रोजगारालाही चालना मिळाली आहे.


सचिन हाडस यांचा प्रवास म्हणजे उद्योगक्षेत्रातील ग्रामीण कल्पकतेचा आदर्श उदाहरण आहे. त्यांनी सिद्ध केले की शिक्षणाशिवायही निरीक्षण, कल्पनाशक्ती, जिद्द आणि मेहनत यांच्या जोरावर मोठे यश शक्य आहे.

.

.

.

#NandurbarUdyog #HerbalTeaSuccess #LocalToGlobal #OBCEntrepreneur #YoungAchiever #RuralInnovation #SuccessStory

Post a Comment

0 Comments