आमलाड ते धानोरा रस्त्याने घेतला मोकळा श्वास…
आमदार राजेशदादा पाडवी यांनी जेसीबी पाठवून काटेरी झुडपे काढले, रस्ता केला मोकळा...
तळोदा तालुक्यातील आमलाड ते धानोरा रस्त्याला दोन्ही बाजुने काटेरी बाभुळच्या झुडपांनी वेढले होते. येणाऱ्या जाणाऱ्याना व वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
प्रवासी वाहन धारकांना इजा झाल्याची घटनाही घडल्यात संबधित विभागाचे दुर्लक्ष झाले होते. माजी तालुका सचिव शुभमभाऊ चौधरी व ग्रामस्थ यांनी आमदार राजेशदादा पाडवी यांच्याकडे ही समस्या मांडली असता आमदार राजेशदादा पाडवी यांनी तत्काळ जेसीबी पाठवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली काटेरी बाभुळ झुडपे काढण्यास सुरवात करण्यात आले आहे.
सदर रस्ता हा रहदारीस मोकळा झाला आहे. माजी तालुका सचिव शुभमभाऊ चौधरी व ग्रामस्थ यांच्या मागणी केली.
आमलाड ते धानोरा रस्त्याने रहदारीस मोकळा झाला. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. असून आमदार राजेशदादा पाडवी यांचे सर्व ग्रामस्थानीं आभार मानले आहेत.




Post a Comment
0 Comments