मुंदलवड ते सुटीपाणी रस्ता दुरुस्ती करा- बिरसा आर्मी
धडगाव- मुंदलवड ते सुटीपाणी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा;यासाठी बिरसा आर्मी धडगाव टीम तहसीलदार व अभियंता रस्ते बांधकाम धडगांव यांना निवेदन दिले.
सदर निवेदन म्हटले आहे की, मुंदलवड ते सुटीपाणी अति खराब रस्ता असल्याने प्रवाशांना मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागतो.रस्त्याची दयनीय स्थिती असल्याने अनेक वेळा बाईकस्वार पडून दुखापत सुद्धा झाले आहे.
काही ठिकाणी फक्त मोठे पोल गाळून ठेवल्याने धोकेदायक परिस्थिती आहे.संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष घालून रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी बिरसा आर्मीचे धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी,सहसचिव पिंट्या वळवी,इंदास वसावे,प्रकाश पावरा,रतिलाल पाडवी,काल्ला वसावे यांनी केली आहे.



Post a Comment
0 Comments