नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेचा यशस्वी शुभारंभ!
नंदुरबार वन विभाग व नंदुरबार रोहयो वनक्षेत्र अंतर्गत मौजे भांगडा (कक्ष क्र. ३०) येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम वन विभाग नंदुरबार आणि इको बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या संपन्न झाला.
याप्रसंगी नंदुरबार प्रांत अधिकारी श्रीमती अंजली शर्मा , पोलीस अधीक्षक श्रावण दत्त, धुळे वनसंरक्षक, प्रादेशिक श्रीमती निनू सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, नंदुरबार अतिरिक्त पोलीस अधीक्षक कांबळे साहेब, कर्नल निर्देश शाह (कमांडिंग ऑफिसर, इको टास्क फोर्स), मेजर प्रमोद बहिरट, डॉ. शरद कासार, नंदुरबार सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, मेजर अनिरुद्ध काळे, सुभेदार सुभाष गव्हाणे, नंदुरबार रोहयो वनक्षेत्रपाल नितीन वाघ, चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी, नवापूर वनक्षेत्रपाल संदीप रणदिवे, नंदुरबार उपनगर पोलीस निरीक्षक किरण खेडकर, नंदुरबार पोलीस निरीक्षक जगन वळवी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी वनक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी, पोलीस विभाग, इको बटालियनचे जवान, गस्ती पथक शहादा, तसेच नवापूर, चिंचपाडा व नंदुरबार येथील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन 2025 च्या पावसाळ्यात इको बटालियनतर्फे 200 हेक्टर क्षेत्रावर 2 लाख विविध प्रजातींची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ही मोहीम जैवविविधता संवर्धन, पर्यावरण संतुलन व हरित क्षेत्र वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
ही मोहीम पर्यावरण रक्षणासाठी जिल्ह्यातील एक आदर्श उपक्रम ठरणार असून, जनतेनेही या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
.
.
.
#वृक्षारोपण2025 #हरितनंदुरबार #EcoBattalion #वनविभाग #SustainableEnvironment #GreenMission #PlantATree 🌿



Post a Comment
0 Comments