तळोदा शहरातील प्राथमिक सुविधा, समस्या सोडविण्याची मागणी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने वाचला तळोदा मुख्याधिकारी समोर समस्यांचा पाढा..
तळोदा :- ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ शाखा तळोदाच्या संयुक्त विद्यमाने तळोदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या समोर विविध प्रभागातील समस्या मांडून जणू समस्यांचा पाढाच वाचला.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नागरी सुविधा प्राप्त देणेबाबत मुख्याधिकारी समोर समस्या मांडतांना शहरातील गटारी तुंबलेल्या असून त्या स्वच्छ करणे, शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन खोदल्या मुळं रस्त्याची झालेली दुरवस्था ठीक करणे, चिनोदा रोडवरील कचरा डेपोतील कचरा रस्त्यावर येतो व विविध प्रभागातील कचराकुंडी यांचीही विल्हेवाट लावणे. अनेक पथदिव्यांच्या पोलवरील बटनांची व दिव्यांची दुरुस्ती करणे. कॉलेज रोडवर रस्त्यावर पाणी साचत असल्याने पाण्याचा योग्य निचरा करणे. पावसाळ्यात रस्ता जलमय होतों त्यामुळे चालणं देखील कठीण होते. त्याच रस्त्यावरून मिशन हायस्कूल, कनिष्ठ, वरिष्ठ व समाज कार्य महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक ये जा करतात त्यांच्या आरोग्याची समस्या भयंकर रुप धारण करतील यांवर जिल्हा अध्यक्ष प्रा आर.ओ.मगरे, जिल्हा सचिव अशोक सुर्यवंशी, तालुका अध्यक्ष डॉ.एस.एन.शर्मा, प्रा.आर.व्ही.राणे व मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या तर साधक बाधक चर्चा करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना तळोदा शाखेचे अध्यक्ष डॉ एस.एन.शर्मा, सहसचिव शरद सुर्यवंशी, प्रवासी महासंघाचे सचिव प्रा.आर.व्ही.राणे, पंकज तांबोळी, जिल्हा अध्यक्ष प्रा आर.ओ.मगरे, सचिव अशोक सुर्यवंशी, जिल्हा सदस्य राजेश चौधरी, जेष्ठ साधक प्रमोद वाणी, मुस्तफा बोहरी इतर साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments