इस्कॉन परिवारातर्फे नंदनगरीत आज भव्य जगन्नाथ रथयात्रा
नंदुरबार (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत अर्थात इस्कॉन परिवारातर्फे आज शनिवार दि. 28 जून रोजी नंदनगरीत भव्य जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येणार आहे.
भारतीय प्राचीन संस्कृतीचे जतन करून इस्कॉन परिवारातर्फे धर्म जनजागृती आणि समाज प्रबोधन करण्यात येत आहे. संस्थापकाचार्य श्री श्रीमद ए.सी. भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या कृपाशीर्वादाने नंदुरबार जिल्ह्यात श्री जगन्नाथ रथयात्रा होत आहे. त्यानुसार आज शनिवारी दुपारी दोन वाजेला भव्य जगन्नाथ रथयात्रेस प्रारंभ होईल.
रथयात्रेस शहरातील मोठा मारुती मंदिरापासून प्रारंभ होईल. देसाईपुरा, शिवाजी रोड, जळका बाजार, सराफ बाजार, सोनार खुंट, महाराष्ट्र व्यायाम शाळा, हाट दरवाजा, गांधी चौक, नेहरू पुतळा चौक,नगर पालिका, आमदार कार्यालय, डॉ. दीनदयाल चौक,
स्टेट बँक मार्गे संजय टाऊन हॉल येथे सायंकाळी सात वाजता समारोप होईल.
जगन्नाथ रथयात्रा मिरवणूक मार्गांवर भाविकांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात येईल. यासाठी समस्त भाविकांनी सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार इस्कॉन परिवारातर्फे करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments