जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
-पी. आर. कोसे
नंदुरबार, दिनांक 27 जून, (जिमाका) :
जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी यामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेसाठी 29 जुलै, 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणीचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
यासाठी पात्रता निकष:
• विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातील (फक्त नवापूर व नंदुरबार तालुका) शासनमान्य शाळेत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पाचवीमध्ये शिकत असावा.
• विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2024 पूर्वी आणि 31 जुलै 2016 नंतर झालेला नसावा. दोन्ही तारखा समाविष्ट आहेत आणि ही अट सर्व उमेदवारांना (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह) लागू आहे.
• विद्यार्थी सलगपणे सन 2023-24, 2024-25 आणि 2025-26 मध्ये अनुक्रमे तिसरी, चौथी आणि पाचवी (खंड न पाडता) उत्तीर्ण झालेला असावा. (सरकार मान्य, सरकारी अनुदानित, मान्यता प्राप्त शाळांमधून)
• अनुसूचित जाती, जमाती, सर्व मुली, अपंग संवर्ग आणि इतर मागासवर्गीयांसाठी जागा राखीव आहेत. तृतीयपंथीय उमेदवार देखील नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया: अर्ज ऑनलाइन पद्धतीने विनामूल्य भरता येणार असून नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 व https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अर्ज भरतांना विद्यार्थ्याचे आधार कार्ड, विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थ्याची सह, पालकांची सही अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जुलै 2026 ही असून प्रवेश परिक्षा 13 डिसेंबर 2025 (शनिवार), सकाळी 11:30 वाजता होणार आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्वरित ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन प्राचार्य श्री. कोसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Post a Comment
0 Comments