तळोदा स्वस्तिक हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरात १२५ दात्यांनी केले रक्तदान
तळोदा :- स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा बघता "सारथी फाऊंडेशन", "तळोदा डॉक्टर्स असोसिएशन" व "पोलिस मित्र परिवार" यांच्या संयुक्त विद्यमाने व जनकल्याण ब्लड बँक धुळे यांच्या अमूल्य सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातून रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला,
शिबिरात १७४ रक्तदात्यांनी नाव नोंदणी केली. शिबिरात १२५ रक्तपिशवींचे संकलन करण्यात आले असून २६ रक्तदात्यांना इच्छा असूनही रक्त कमी असल्यामुळे परत फिरून जावे लागले. भर पावसात सुद्धा रक्तदानाच्या हाकेला प्रतिसाद देणाऱ्या समस्त जबाबदार नागरिकांबद्दल सारथी फाऊंडेशन व स्वस्तिक हॉस्पिटल टीम ने कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शहादा - तळोदा विधानसभा क्षेत्रप्रमुख कैलाश चौधरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तळोदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे हे उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदात्यांना प्रेरणा दिली व कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. संदीप जैन, डॉ. महेश मोरे, डॉ. सुनील लोखंडे व त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर्स व हॉस्पिटल स्टाफ ने मेहनत घेतली व सारथी फाऊंडेशन च्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्यासाठी सर्व तळोदा पोलिस मित्र परिवार यांचे आभार मानले.


Post a Comment
0 Comments