मराठा समाज युवा मंडळाची कार्यकारिणी निवड अध्यक्षपदी विश्वजित मुकेश फोके यांची सर्वानुमते निवड
तळोदा येथील मराठा समाज बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेची मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली.
यावेळी मराठा युवा मंडळाची तळोदा शहर नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी विश्वजित मुकेश फोके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पुढील कार्यकारिणी अशी उपाध्यक्षपदी राजेश शंकर जाधव, सचिव संतोष कृष्णा पडोळे, खजिनदार गणेश नाना गायकवाड, संचालक गणेश विनोद शिंदे, प्रशांत सुभाष गाढे, आनंद संजय शिंदे, दिगंबर सुधिर बोराडे, मनोज गिरधर आभळे, उमेश सदाशिव पवार, देवेंद्र रतीलाल साळुंखे, सागर मोहन मराठे, चेतन देविदास चव्हाण, गणेश माधव गाढे, रुपेश प्रकाश शिंदे यांची निवड करण्यात आली. तसेच संस्थेचे सचिव महेंद्रभाऊ गाढे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष नवनीत शिंदे, कोषाध्यक्ष प्रा. एम.ओ. पवार, संचालक दिलीपभाऊ जगदाळे, शिवाजीराव भवर, अशोकभाऊ चव्हाण, सुभाष शिंदे, अनिल शिंदे, राजु गाढे, दिनेश फोके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र गाढे, धनराज शिंदे आदी समाज बांधव उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments