नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल ओलंपियाड स्पर्धेत सुवर्ण पदकाने सन्मानित
तळोदा शहरातील नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये घेण्यात येणाऱ्या इंडियन टॅलेंट ओलंपियाड स्पर्धेत 80 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात 69 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात विशेष गुणवत्ताधारक दहा विद्यार्थी गोल्ड मेडल सात विद्यार्थी सिल्वर मेडल व इतर सात विद्यार्थी ब्रांझमेडल ने सन्मानित करण्यात आले.
गणित विषयात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक वर लक्ष दिनेश पाटील तर तिसऱ्या क्रमांकावर मेद्यावी मिथुन परदेसी यांनी विशेष यश प्राप्त केले अवनी भगत सुमित चौधरी जानवी वळवी हिमांशू पाडवी या विद्यार्थ्यांना देखील एक्सीलेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर K.G.सेक्शन मधील 47विध्यार्थी गोल्ड मेडल ने सन्मानित करण्यात आले
तसेच बेस्ट प्रिन्सिपल बेस्ट टीचर व इन्स्पायरिंग टीचर या पुरस्काराने शिक्षक देखील सन्मानित करण्यात आले विद्यार्थी व शिक्षकांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिल तुरखिया उपाध्यक्ष डी एम महाले संचालिका सोनाबेन तूरखीया सचिव संजय पटेल संस्था समन्वय हर्षिलतुरखी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले मुख्याध्यापक पी.डी.शिंपी व उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले गीतांजली पाटील सुमित्रा तांबोळी प्रतिभा बैसाणे सोनाली बांदेकर भावना शिंपी बादल वळवी योगिता शिंदे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले

Post a Comment
0 Comments