गौऱ्या जीप शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा गुण गौरव संपन्न
धडगाव तालुक्यातील गौऱ्या येथील जि. प. शाळा नवोदय उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उत्तीर्ण, एकलव्य उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांचा गौरव करण्यात आला.
धडगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनराज राजपूत, सिसा बिटचे शिक्षणाविस्तार अधिकारी ज्ञानेश्वर चित्ते, केंद्रप्रमुख करनसिंग वसावे धडगाव तालुक्यातील सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी गौऱ्या शाळेत गुणवंत नवोदय उत्तीर्ण विद्यार्थी प्रितेश दिलवर पराडके, ग्रीष्मा आपसिंग पराडके व पालकांचा सत्कार केला.
तसेच एकलव्य उत्तीर्ण विद्यार्थी अर्चना कुवरसिंग पराडके, रक्षा देवीसिंग पराडके व पालकांचा सुद्धा सत्कार मान्यवरानी केला. शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थी प्रितेश दिलवर पराडके, मंगेश भरत पराडके, ग्रीष्मा आपसिंग पराडके राजेश्वरी गावंजी पराडके, रक्षा देवीसिंग पराडके, अर्चना कुवरसिंग पराडके यांचा सुद्धा गौरव करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी राजपूत यांनी शाळेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. व शिक्षकांचे सुद्धा कौतुक केले. सर्वच मान्यवरांनी शाळेचे कौतुक करून गुणवंत विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.




Post a Comment
0 Comments