बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिवस वृक्षारोपण तसेच जनजागृतीपर कार्यक्रम
बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिवस वृक्षारोपण तसेच जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. भूषा परिमंडळातील पलासझाडी नियतक्षेत्रातील मौजे पलासझाडी येथील पाटील पाड्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजी वळवी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तिज्या पाडवी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी वनरक्षक पलासझाडी वसंत पटले यांनी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचा उद्देश आदिवासी बोली भाषेत उपस्थित नागरिकांना समजावून सांगितला. त्यात अवैध वृक्षतोड, अवैध अतिक्रमण, अवैध चराई इत्यादीमुळे पर्यावरणाची होत असलेली हानी याबाबत माहिती दिली.
वनरक्षक अजय पाडवी यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची जोपासना किती गरजेची आहे याबाबत उपस्थित नागरिकांना सखोल माहिती दिली. त्यानंतर वनपाल भूषा भरतसिग परदेशी यांनी उपस्थित नागरिकांना पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्व नागरिकांची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगून मानव वन्यजीव संघर्ष त्याची कारणे , बेसुमार वृक्षतोडीमुळे व वनवंणवामुळे होत असलेले पर्यावरणाचे नुकसान, वन्य जीवांची कमी होत चाललेली संख्या ,पर्यावरणाचा बिघडलेला समतोल याबाबतीत उदाहरणासह समजावून सांगितले व येत्या पावसाळ्यात सर्व नागरिकांनी आपल्या शेताच्या बांधावर तसेच घराजवळ मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात शिवाजी वळवी यांनी उपस्थित नागरिकांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षतोड करू नये असे आवाहन केले. त्यानंतर दुपारी बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्राच्या कार्यालय आवारात वनपाल माळ श्रीमती प्रतिभा बोरसे, सुषमा पवार , राकेश ठाकरे, भरतसिंग परदेशी , लेखापाल महेश ठाकूर, वनरक्षक मांगा वळवी, वनरक्षक श्रीमती पुनम पावरा, मनीषा पावरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. बिलगाव वनक्षेत्रातील सदरचे कार्यक्रम म.उपवनसंरक्षक सो. नंदुरबार संतोष सस्ते साहेब यांच्या आदेशान्वये व म. सहाय्यक वनसंरक्षक सो.(रोहयो) अक्राणी संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बिलगाव प्रादेशिक श्रीमती चारुशीला काटे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भूषा भरतसिंग परदेशी, राकेश ठाकरे , श्रीमती प्रतिभा बोरसे, सुषमा पवार ,वनरक्षक वसंत पटले, आकाश पावरा, अमरसिंग पावरा, अजय पाडवी, वनरक्षक श्रीमती ज्योती पावरा, सविता पावरा, कविता पवार, रखवालदार राकेश वसावे, स्थानिक नागरिक सेगा पावरा, पिंटू पाडवी, व निलेश पराडके , चंदन पावरा आदींनी प्रयत्न केले.




Post a Comment
0 Comments