Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिरपूर-शहादा महामार्ग दुरुस्ती करणासाठी शिरपूर फर्स्ट चे आक्रमक आंदोलन रस्त्यावरील खड्ड्यात टाकल्या खेळण्यातील नोटा अर्धा तास रास्ता रोको

 शिरपूर-शहादा महामार्ग दुरुस्ती करणासाठी शिरपूर फर्स्ट चे आक्रमक आंदोलन 

रस्त्यावरील खड्ड्यात टाकल्या खेळण्यातील नोटा 

अर्धा तास रास्ता रोको 

शिरपूर अंकलेश्वर- बऱ्हाणपूर हा महामार्ग शिरपूर शहरातून जातो. या महामार्गावर शिरपूर पासून ते शहादापर्यंत मोठ्या प्रमाणावर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघातही होत असतात.या महामार्गाला निधी मिळूनही दुरुस्ती करण होत नाही व रस्त्यावर मोठ मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.या विरोधात शिरपूर फर्स्ट ने रास्ता रोको सह खेळण्यातील नोटा घेऊन त्या रस्त्यावरील खड्ड्यांत टाकून  आंदोलन केले आहे. 

    शिरपूर ते शहादा रस्ता हा अतिशय खराब झालेला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या संदर्भात वेळोवेळी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याने वापरणाऱ्या वाहनांचा अपघात  होतात. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना  तारेची कसरत करावी लागते. सदर रस्ता हा रस्त्यात खड्डा आहे की पूर्ण रस्ताच खड्ड्यात गेला आहे अशी अवस्था या रस्त्याची आहे मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

  या विरोधात दिनांक १०  रोजी सकाळी शिरपूर फर्स्ट च्या वतीने वाघाडी गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरण्यात आलेला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली  होती. सदर अंकलेश्वर -  बऱ्हाणपूर महामार्गाला २०२३ या वर्षांत दुरुस्ती साठी ६३ कोटींचा निधी मिळालेला आहे. मात्र एवढा निधी मिळाल्यावरही रस्त्याचे दुरुस्तीकरण होत नाही हा मोठा प्रश्न आहे.  या रस्त्याला मिळालेला निधी नेमका गेला कुठे?  असा प्रश्नही शिरपूर फर्स्ट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे आणि या विरोधात शिरपूर फर्स्ट संघटने कडून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात खेळण्यातील नोटा टाकून सदर निधी हा खड्ड्यात गेल्याचे आगळे वेगळे आंदोलन केले आहे.

    संघटनेच्या वतीने यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात वटसावित्री पौर्णिमा असल्याने वडाचे झाड लावण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर संघटनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. सदर रस्त्यावर गावालगतच शाळा आहे.शाळेजवळच असलेल्या पुलावर खड्डे पडले असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. या संदर्भात या अगोदरही आंदोलन करण्यात आलेले आहे. मात्र प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही अशी अवस्था या शिरपूर-  शहादा रस्त्याची झालेली आहे.

      शिरपूर-शहादा रस्ता हा अंकलेश्वर बऱ्हाणपूर या महामार्गावर येतो. या महामार्गासाठी सन २०२३  ला ६३  कोटी रुपये निधी मिळालेला आहे. एवढा निधी मिळूनहीं या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत मग नेमका निधी गेला कुठे ? हे विचारणारे कोणीही नाही. मात्र आता या रस्त्याचे दुरुस्ती करण झाले नाही  तर रस्त्यावरील खड्ड्यातील पाणी एनएचएआय च्या जिल्हा कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांवर टाकण्यात येईल. असा इशारा शिरपूर फर्स्ट व  ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments