शहादा तालुक्यासाठी नवीन तीन एस. टी. बसेसचा आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण!
शहादा आगारास नवीन तीन एस. टी. बस उपलब्ध झाल्यात बस स्थानकावर आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास परिसराचे नेते बापूसाहेब दिपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंदभाई पाटील तसेच शहादा आगारप्रमुख भोई यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन बसेसचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यास शहादा शहरातील नागरिक, शहादा आगारातील समस्त कर्मचारी, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, एस.टी. महामंडळाचा वर्धापन दिनही साजरा केला दी. 1 जून 1948 रोजी पहिली एस.टी. बस मुंबई ते पुणे मार्गावर धावली होती.
त्या ऐतिहासिक दिवसानिमित्त शहादा तालुक्यासाठी नव्या बससेवेचं लोकार्पण होणं ही गौरवाची बाब आहे!
.
.
#BJP #shahada #taloda #ST





Post a Comment
0 Comments