Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अक्कलकुवा भाजपाच्या वतीने माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त गर्भवती महिलांना सकस आहाराचे किट, साड्यांचे वाटप

 अक्कलकुवा भाजपाच्या वतीने माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त गर्भवती महिलांना सकस आहाराचे किट, साड्यांचे वाटप 

              अक्कलकुवा :- संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाण्याविहीर येथे  आयोजित कार्यक्रमात गर्भवती महिलांना  सकस आहाराचे किट तसेच साड्यांचे वाटप करण्यात आले.

          अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे अक्कलकुवा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, सरपंच जयमल पाडवी, विशाल तडवी, माजी उपसरपंच जगदीश वसावे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भूषण पाडवी,लालसिंग नाईक सरपंच भूपेंद्र पाडवी सरपंच सुरेश वसावे सरपंच जयपाल वसावे उदयसिंग पाडवी, शुभम पाडवी ,वैभव पाडवी आदी मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते . यावेळी परिसरातील गर्भवती महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रत्येक महिलेला सकस आहार व साड्यांचे वाटप करण्यात आले.  माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी उपस्थित महिलांना गर्भवती महिलांना गर्भावस्थेत सकस आहाराचे महत्त्व सांगून या अवस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन करून माता सुदृढ तर संपूर्ण कुटुंब सुदृढ असते असे सांगून सुदृढ आरोग्याचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी  भाजप जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी सांगितले की, अक्कलकुवा तालुक्यामध्ये संसदरत्न माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी महिलांसाठी तसेच तालुक्यात केलेल्या लोकोपयोगी व कल्याणकारी कामांची माहिती देत गरोदर मातांना सकस आहाराचे किट व साड्या वाटप  करण्याच्या या कार्यक्रमाचा उद्देश सांगत   गरोदर अवस्थेत मातांना सकस व पोषक आहारामुळे गरोदर माता व जन्मणाऱ्या बाळाचे आरोग्य सुदृढ होऊन भविष्यात शारीरिक व मानसिक सुदृढता येऊन त्याचा सर्वांगीण विकास होतो आदिवासी भागात गरोदर माता व नवजात बालकांना अनेक समस्या उद्भवतात  परिणामी त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात वेळीच खबरदारी घेऊन गरोदर मातांनी सकस आहार व आरोग्याची काळजी घेतल्यास नवजात बालकाच्या सर्वांगीण विकासासह कुटुंबाचाही आर्थिक विकास होतो. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व  सूत्रसंचालन अनिल जावरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments