Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आश्रम शाळांतील बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी भरती बंद करण्याची मागणी बिरसा आर्मीचे मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री व आयुक्तांना निवेदन

 

आश्रम शाळांतील बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी भरती बंद करण्याची मागणी


बिरसा आर्मीचे मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री व आयुक्तांना निवेदन

तळोदा:शासकीय आश्रम शाळांमध्ये बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी भरती बंद करून नियमित कायम पदभरती राबवावी;यासाठी बिरसा आर्मीने प्रकल्प अधिकारी तळोदा मार्फत मुख्यमंत्री,आदिवासी विकासमंत्री व आयुक्त नाशिक यांना निवेदन पाठवले आहे.सदर निवेदनात म्हटले आहे की,शासन आदेश क्र.३६०२४/६ दि. २१ में २०२५ रोजी आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची पदे १६ नोव्हेंबर २०२२ सुधारित आकृतीबंधाच्या संदर्भानुसार १७९१ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.मुळात सदर १६ नोव्हेंबर २०२२ च्या सुधारित आकृतीबंधामध्ये कुठल्याही प्रकारे वरील संदर्भीय शासन निर्णयामध्ये नमूद शिक्षक संवर्गाचे पद हे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात तरतूद करण्यात आलेली नाही.सदरील नमूद पदे ही शासन निर्णयात नियमित वेतनश्रेणीवर भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.त्यामुळे १७९१ पदे बाह्यस्रोताद्वारे भरणे पूर्णतःअयोग्य व असंविधानिक व अन्यायकारक ठरते.सद्यस्थितीत आदिवासी विकास विभागातील शिक्षक संवर्गाच्या प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या पदांची संख्या ही एक चिंतनीय बाब आहे.त्यातूनही घातक म्हणजे आपण सदरची रिक्तपदे बाह्यस्रोताद्वारे भरण्याचा घेतलेला निर्णय आहे.शासकीय आश्रम शाळा खाजगीकरण करण्याचा शासनाचा मानस असल्याचे दिसून येत आहे व ही बाब सामाजिक स्थिरता,संधीची व सेवा शाश्वतीचा भंग करणारी आहे.विभागातील ९५% आश्रम शाळा या पेसा क्षेत्रात मोडतात व नियमानुसार पेसा क्षेत्रातील कर्मचारी हे स्थानिक आदिवासी समाजातील असतात.त्यामुळे या शासन निर्णयामुळे आदिवासी युवकांना सरकारी नोकरीपासून कायमस्वरूपी वंचित ठेवले जाणार असून,ही बाब आदिवासी समाजाच्या विकासाऐवजी भकासाकडे नेणारी ठरेल.बाह्यस्रोताद्वारे घेतलेला २१ में २०२५ रोजीचा निर्णय तात्काळ रद्द करावा व सदरची सर्व रिक्तपदे नियमित नियुक्ती पद्धतीने भरण्याची मागणी केली आहे.निवेदनावर बिरसा आर्मीचे जिल्हा सचिव सतिश पाडवी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,धडगाव तालुकध्यक्ष अजय वळवी,मोदलपाडा शाखाध्यक्ष रोहिदास वळवी,लालसिंग वळवी,कुशल वळवी,दिनेश वसावे,सखाराम पाडवी,हर्षल पाडवी आदी. कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments