Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदुरबार जिल्हा प्रशासनाचं पुढाकाराने “धरती आबा अभियान” – आदिवासी विकासासाठी समर्पित उपक्रम

 नंदुरबार जिल्हा प्रशासनाचं पुढाकाराने “धरती आबा अभियान” – आदिवासी विकासासाठी समर्पित उपक्रम

केंद्र सरकारद्वारे 15 ते 30 जून 2025 या कालावधीत संपूर्ण देशभरात "धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान" व "PM-JANMAN" अंतर्गत व्यापक जनजागृती व लाभ वितरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश म्हणजे आदिवासी समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत शासकीय योजनांचे थेट लाभ पोहोचवणे व सामाजिक-आर्थिक सशक्तीकरण घडवणे.


मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली "धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान" अंतर्गत दिनांक 15 ते 30 जून 2025 या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी वस्ती आणि ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती व लाभ वितरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.


अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट:


शासनाच्या सेवा आणि योजनांचा लाभ गावपातळीवर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे.

717 आदिवासी गावांमध्ये 100% शासकीय लाभ वितरित करणे.

आधार कार्ड, बँक खाती, गॅस कनेक्शन, आयुष्मान कार्ड्स, अन्नधान्य कार्ड्स यांसारखे लाभ ऑन-द-स्पॉट दिले जातील.


नंदुरबार जिल्ह्यातील अंमलबजावणी:


प्रत्येक तालुक्यात ITDP, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या समन्वयाने शिबिरे आयोजित केली जातील

ग्रामसभांद्वारे जनजागृती, आश्रमशाळा, SHG गट, महिला व युवा स्वयंसेवक  सहभागी होतील.

आरोग्य शिबिरांतून क्लबफूट, सिक्कल सेल, मातृ- बाल आरोग्य तपासणी

पेंशन योजना, दिव्यांग सवलती, PMJJBY/PMSBY योजनांची नोंदणी

शिबिरे गाव पातळीवर आयोजित करून त्याचे GIS व फोटोद्वारे ट्रॅकिंग होणार


जिल्हा प्रशासनाचा पुढाकार:


नंदुरबार जिल्हा प्रशासनाने या अभियानासाठी गावपातळीवर शिबिर नियोजन व यादीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. "Change Leaders" तयार करून नेतृत्व विकासाला चालना दिली, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना प्रशस्तीपत्र व डिजिटल प्रचारातून गौरव करण्याचे नियोजन.


महत्त्वाच्या तारखा:


13 जून: प्रचार साहित्याचे वितरण व IEC व्हॅन कार्यान्वित

15 जून: अभियानाचा जिल्हा स्तरीय शुभारंभ

15-30 जून: सर्व तालुक्यात एकात्मिक लाभ वितरण शिबिरे व जनजागृती उपक्रम


 “आपलं गाव – आपला अभिमान” या भावनेतून नंदुरबार जिल्हा प्रशासन समावेशक, प्रभावी आणि सर्वस्पर्शी प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध आहे.


✨ नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, आपल्या गावात होणाऱ्या शिबिराची माहिती घेऊन आपल्या अधिकारांचे संरक्षण व विकास यासाठी पुढाकार घ्यावा, ही नम्र विनंती.


#धरतीआबा_अभियान #PMJANMAN #janjatiyautkarsh #collectornandurbar #myvillagemypride #gramvikas #TribalEmpowerment #nandurbarforall

Post a Comment

0 Comments