Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारीसाठी तळोदा तालुक्यात नियोजनात्मक बैठक

 नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारीसाठी तळोदा तालुक्यात नियोजनात्मक बैठक 

दिनांक 11 जून 2025 रोजी तळोदा तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयक बैठक आयोजित करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी, उपाययोजना व विभागनिहाय तयारी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


बैठकीत विविध विभागांनी आपापल्या स्तरावर केलेल्या पूर्वतयारींची माहिती सादर केली. चर्चेदरम्यान काही विभागांतील त्रुटी लक्षात आल्याने संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


यावेळी नदीकाठच्या गावांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस उपयोगी पडणारे साहित्य वाटप करण्यात आले व त्याचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.


ही बैठक तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन अधिक सशक्त व गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.

Post a Comment

0 Comments